निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात दि. २४/०८/२०२४रोजी स.११.००वा. विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मार्गदर्शक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमेश्वर नगर येथील मा.श्री.पांडुरंग कन्हेरे साहेब यांनी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठीचे विविध उपाय सांगितले .काही समस्या आल्यास ११२ टोल फ्री नंबर वर संपर्क साधावा. विद्यार्थी सुरक्षा कामी समाजातील सर्व घटक आपल्या सोबत असल्याने आपण काळजी करू नये,मात्र सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे असे त्यांनी मत व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल मा.श्री भोसले साहेब व मा.श्री.शेंडकर साहेब व त्यांचे सह सर्व सहकारी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दीपाली ननावरे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकात विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षा संदर्भात राबवल्या गेलेल्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजाराम भगत यांनी केले व आभार श्री.विजय सूर्यवंशी यांनी मानले.
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सतीशभैया काकडे दे. उपाध्यक्ष मा. श्री. भीमराव बनसोडे सर व मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे.यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.