बारामती ! रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यावर कोऱ्हाळे बु मुस्लिम समाजाकडून पोलिस स्टेशनला निवेदन देऊन निषेध व्यक्त .
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी – फिरोज भालदार
दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाचे पैगंबर मोहम्मद स.अ.स यांच्या बद्दल पंचाळे ता. सिन्नर जि. नाशिक या ठिकाणी रामगिरी महाराजांचे सप्ताह दरम्यान प्रवचनामध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल जे वक्तव्य करून दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम व मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम समाजाच्या वतीने महाराजांबद्दल आक्रोश व्यक्त करून निषेध करण्यात येत आहे .
रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाचे पैगंबर मोहम्मद स. अ.स यांच्या बद्दल जे वक्तव्य केले यामध्ये सर्व मुस्लिम समजाचे भावना दुखवण्यात आले . याचअनुषंगाने कोऱ्हाळे बु येथील मुस्लिम समाजाकडून वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे निवेदन देत झालेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला . रामगिरी महाराज यांच्यावर लवकर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी कोऱ्हाळे बु मुस्लिम समाजाकडून निवेदनामध्ये करण्यात आली आहे .
