• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती: मावळा जवान संघटना व स्वराज्य फाऊंडेशन याकडून किल्ले बांधणी स्पर्धेतील स्पर्धकांचा सन्मान
Image

बारामती: मावळा जवान संघटना व स्वराज्य फाऊंडेशन याकडून किल्ले बांधणी स्पर्धेतील स्पर्धकांचा सन्मान

प्रतिनिधी

मावळा जवान संघटना संचलित स्वराज्य फाउंडेशन यांच्या वतीने दर वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी दिवाळीत भव्य गड किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन मावळा जवान संघटनेचे बारामती तालुका अध्यक्ष श्री प्रदीप ढुके यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले.

आधुनिक काळात देखिल इतिहास, गड-किल्ले यांचा वारसा जपणेचे कार्य दरवर्षी प्रमाणे निरंतर करत आहेत.या निमित्ताने बारामती येथील किल्ले बांधणी स्पर्धेमधिल स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.इतिहासाचे जतन करण्यासाठी करीत असलेल्या संकल्पनेचे सर्व थरातून कौतुक होत आहे.किल्ला बांधलेल्या ठिकाणी जाऊन मुलांचा सन्मान करताना या प्रसंगी काटेवाडी येथिल महेश काटे यांना गौरविण्यात आले.या निमित्ताने गड-किल्ले यांचे महत्व कळावे यासाठी मुलांना प्रत्यक्ष गड किल्ले दाखवून ऐतिहासिक मावळ्यांचे वंशज आणि इतिहासाची आवड जोपासणेचा प्रदीप ढुके यांचा मनोदय असून नुकतेच त्यांनी मुर्तिशात्र आणि मुर्तिविज्ञान विषयात अभ्यास पूर्ण केला आहे.किल्ला बांधणी 2024 स्पर्धेचे हे 7 वे वर्ष असून दिनांक 30 ते 5 या कालावधीत करण्यात नियोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना नुकतेच गौरविण्यात आले. स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.मोहिमेमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होऊन शूरवीर मावळ्यांचा इतिहास पुढील येणाऱ्या पिढीने जपावा यासाठी या गड-किल्ले बांधणी मोहिमेमध्ये दरवर्षी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

बारामती तालुक्यातील 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला.या वर्षीचे विशेष इंदापूर,दौंड, भोर, सातारा, कोल्हापूर याठीकानाहून अनेकांनी स्पर्धेसाठी नोंदणी झाली होती यामध्ये काटेवाडी येथील महेश काटे यांनी उत्कृष्ट असा लोहगड किल्ला बनविला. निंबुत येथील अवधूत प्रमोद येळे,नेवसे रोड येथील गौरव तपकिरे यांनी विविध गटात क्रमांक मिळवला. सहभागींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.फेब्रुवारी 2025 रोजी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यदिनानिमित इतिहासकालीन मावळ्यांचे वंशज यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.या प्रसंगी मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष प्रदीप ढुके,अश्विनीकुमार पतकी,नितीन मांडगे,नानासाहेब साळवे रमेश मरळ-देशमुख उपस्थित होते.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026