• Home
  • माझा जिल्हा
  • महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, राज्यात गृहमंत्रालय महिला आयोग कार्यरत आहे का ? गजानन भगत 
Image

महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, राज्यात गृहमंत्रालय महिला आयोग कार्यरत आहे का ? गजानन भगत 

प्रतिनिधी – फिरोज भालदार

 राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात महिला कधी नव्हे तेवढ्या असुरक्षित झाल्या आहेत. गृहमंत्री आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी याबाबत बोलावे असे आवाहन मानवाधिकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रमुख गजानन भगत यांनी केले आहे. यांनी महिलावरील अत्याचारासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून म्हटले आहे की महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या महिलांना सन्मान मिळवून देणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात महिलावरील अत्याचारात अलीकडील काळात खूप मोठी वाढ झालेली आहे. पुण्याच्या जवळच राजगडाच्या पायथ्याशी झालेली- दर्शना पवार या उदयोन्मुख अधिकारी युवतीची हत्या, मुंबईतील कुकर कांड किंवा महिला आयोगाचे अध्यक्ष राहत असलेल्या पुणे शहरातील एमपीएससी करणाऱ्या युवतीवरील कोयत्याचा हल्ला किंवा कालच उस्माननगर येथील विष पाजून हत्या या सर्व बाबी पाहिल्या तर महाराष्ट्र राज्यात कायदा व सुव्यवस्था नसल्याचे जाणवते.

  विशेषता महिलांच्या सुरक्षेबाबत कुठलीच उपाय योजना गृहमंत्रालय व शासनाकडून करण्यात आलेली नाही. दिवसा गणित वेगवेगळ्या भागात महिलांवर अत्याचार होतानाच्या पाहायला मिळतात. या बाबीचा महिलांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. राज्य सरकार, गृहमंत्रालय आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांना आवाहन

लवकरात लवकर महिलांच्या सुरक्षेबाबत कडक पावले उचलून आया बहिणींना सुरक्षेबाबत संरक्षण द्यावे. अन्यथा मानवाधिकार संरक्षण समिती सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे

आवाहन मानवाधिकार संरक्षण समिती चे महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रमुख गजानन भगत यांनी केले.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026