Image

सदोबाचीवाडी (होळ) येथे कृषीकन्यांमार्फत वृक्षारोपण

– प्रतिनिधी

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट टस्ट्र संचलित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामती येथील कृषीकन्यांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्य‌क्रमांतर्गत सदोबाचीवाडी येथील अंगणवाडी परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी सदोबाचीवाडी गावचे ग्रामस्थ विलास कारंडे, हनुमंत कारंडे, निखिल आगम, ग्रामपंचायत कर्मचारी इकबाल शेख, शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका सौ. भिसे, आणि शालेय विद्‌यार्थी यांनी कृषीकन्यांसमवेत वृक्षारोपन केले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ही एक महत्त्वकांक्षी मोहिम कृषीकन्यांनी हाती घेतली आहे. वृक्षारोपन ही मानवी जीवन आणि निसर्ग परस्परावलंबाचे प्रतिक आहे. जे आपल्या भविष्या‌साठी एक समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यास मदत करेल. या वृक्षारोपणामध्ये कृषीकन्या ऐश्वर्या पोळ, साक्षी जगताप, दिप्ती खैरे, नेहा शिर्के, प्राप्ती बोधले, प्रणिता कर्णे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडला. ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन श्री राजेंद्र पवार , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री निलेश नलावडे, प्राचार्या प्रा. जया तिवारी, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलकंठ जंजिरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. मयूर पिसाळ, डॉ .पल्लवी देवकाते, प्रा.शिवानी देसाई, प्रा.अभिषेक गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

Releated Posts

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026