• Home
  • माझा जिल्हा
  • भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्ष पूर्ण होऊन ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत.
Image

भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्ष पूर्ण होऊन ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत.

प्रतिनिधी.
महाराष्ट्र राज्यात “हर घर तिरंगा” अभियान २०२४ अंतर्गत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले.
या निमित्त महाराष्ट्राचे शैक्षणिक व सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या आणि ‘स्वावलंबी जीवन हेच आमचे ब्रीद’
या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने भारलेल्या
रयत शिक्षण संस्थेचे
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे ज्युनियर कॉलेज पिलीव या प्रशालेत
आज १३ ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.
प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून ध्वजगीत, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून ‘भारत माता की जय’ व ‘स्वातंत्र्य दिनाचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.
यानिमित्त भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महान देशवासी यांचे स्मरण करून त्यांच्या बलिदानाला सलाम केला.
याप्रसंगी प्रशालेचे सन्माननीय प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Releated Posts

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026