दोन कोटींच्या चरससह एकाला अटक

क्राईम

प्रतिनिधी

बोरिवली पूर्व येथे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत सात किलो चरससह एकाला अटक करण्यात आली. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या चरसची किंमत दोन कोटी ११ लाख रुपये असून त्याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ २५ ते २७ वर्ष वयोगटातील एक संशयीत अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ सापळा रचण्यात आला. आरोपी तेथे येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता त्यात १४ वड्या मिळाल्या. त्यामध्ये एकूण ७ किलो ४० ग्रॅम वजनाचा चरस सापडला. या चरसच्या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे दोन कोटी ११ लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.