लहान बालकाचे (भाचा) अज्ञानपणाचा फायदा घेवुन मामाकडुन खंडणी घेतली, माळेगाव पोलीसांनी केली भामट्या सामाजिक कार्यकर्त्यास अटक

Uncategorized

प्रतिनिधी

तकारदार  श्री. अभिजित संपत शिंदे, रा. सुपे ता. बारामती जि.पुणे यांना इसम नामे प्रमोद मानसिंग जाधव रा. माळेगाव ता. बारामती जि.पुणे याने तकारदार श्री अभिजित शिंदे यांनी त्यांचे नात्यातील बालकाचे लैंगिंक शोषण केलेबाबत खोटा बनावट व्हिडीओ तयार करुन गुन्हा दाखल होणेची भिती दाखवून गुन्हा दाखल होवु दयायचा नसेल तर एकूण ४,००,०००/- रुपयांची मागणी करुन ते पैसे घेवून तक्रारदार यांना प्रमोद जाधव एस. एस. एम हायस्कुल समोरील ऑफिसमध्ये बोलाविले आहे अशी तकार घेवुन तक्रारदार नामे श्री. अभिजित शिंदे हे काल दि.३१/०७/२०२४ रोजी माळेगाव पोलीस ठाणे येथे तकार देणेकरीता आलेने माळेगाव पोलीस स्टेशन डे ऑफीसर पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय नागरगोजे यांनी सदर तक्रारीचा आशय व गांभीर्य ओळखुन सदरची माहीती तात्काळ मा.डॉ. श्री. सुदर्शन राठोड सोो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग व माळेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी स.पो.नि.श्री. नितीन नम यांना कळविलेने त्यांनी सदर बाबत खात्री करुन योग्य ती कायदेशीर करणेची सुचना दिलेल्या होत्या.

त्या अनुषंगाने माळेगाव पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय नागरगोजे, पोलीस श्री. अमोल खटावकर, श्री देविदास साळवे व पोलीस स्टाफ यांची दोन वेगवेगळी पथके तयार करून तक्रारदार यांना त्यांचे जवळ रोख रक्कम पंचवीस हजार रूपये घेवुन त्यांना तक्रारदार यांना संशयिताचे एस.एस.एम हायस्कुल समोरील ऑफिसमध्ये पाठवुन तक्रारदार याने संशयीत आरोपी प्रमोद मानसिंग जाधव याने पैसे स्विकारले नंतर तकारदार यांना इशारा करणेबाबत माहीती दिले प्रमाणे तक्रारदार याचे कडुन रोख रक्कम २५,०००/- रुपये संशयीत आरोपी प्रमोद मानसिंग जाधव याने त्याचे ऑफिस मध्ये स्विकारलेने शासकीय पंच व पोलीसांनी रंगेहाथ रोख रक्कमेसह ताब्यात घेवुन तकारदार नामे श्री अभिजित शिंदे यांचे तकारीवरुन माळेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं- १९४/२०२४ भारतीय न्याय संहिता कायदा कलम ३०८(२) (३) (६) सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम २२(१), (३) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास सदर गुन्हयाचे तपास कामी अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी मा.श्री. पंकज देशमुख सोो., पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. संजय जाधव सोो., अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा. डॉ. श्री. सुदर्शन राठोड सोो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, व श्री. नितीन नम सहा. पोलीस निरीक्षक, माळेगाव पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय नागरगोजे, श्री. देविदास साळवे, श्री. अमोल खटावकर, पोलीस अंमलदार श्री ज्ञानेश्वर शंकर मोरे, श्री. जयसिंग रोहिदास कचरे, श्री. अमोल कोकरे, श्री. अमोल राऊत यांनी केलेली आहे.