प्रतिनिधी
*
प्रत्यक्ष उपोषण स्थळी येऊन उपजिल्हाधिकारी श्री. स्वप्निल मोरे (पुनर्वसन शाखा) यांनी उपोषणकर्त्यांशी केली चर्चा
खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे यांनीही उपोषणाला भेट देऊन उपोषण कर्त्यांबरोबर व ग्रामस्थां बरोबर चर्चा केली आहे. व तसा रिपोर्ट वरिष्ठांना पाठवला आहे.
खेड तालुक्यातील चास कमान धरण, आणि भामा आसखेड धरण अंतर्गत काळुस या गावातील शेतकऱ्याच्या जमिनीवर चाळीस वर्षांपूर्वी पुनर्वसनाचे शिक्के टाकण्यात आले आहेत. ते अद्याप कायम आहेत. येथील बाधित शेतकरी गेली ४0 वर्षे वेगवेगळ्या मार्गाने पुनर्वसन शिक्के काढण्यासंदर्भात संघर्ष करीत आहे चाळीस वर्षे लढा देऊनही शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. म्हणून १५ ऑगस्ट २०२४ भारतीय स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांनी केला आहे.
स्वातंत्र्यदिनीशेतकऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनास वाढता पाठिंबा मिळत असून तरुण ,महिला, वृद्ध, व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले आहेत. याची दखल घेऊन खेडचे प्रांताधिकारी श्री. अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे यांनी उपोषण स्थळी जाऊन उपोषणकर्त्यां बरोबर चर्चा केली आहे. व त्या पद्धतीने रिपोर्ट वरिष्ठांकडे पाठवले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून सोमवार दि.१९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:०० या वेळेत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन शाखा) श्री. स्वप्निल मोरे यांनी उपोषण स्थळी येऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. असून उपोषणकर्त्यांची म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उपोषणकर्त्यांना मंगळवार दि.२० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २;३०वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे. व तसे लेखी पत्र देण्यात आले आहे.
जरी बैठकीचे निमंत्रण देण्यात आले असले तरी या बैठकीत पुनर्वसनाची शिक्के काढणे संदर्भात योग्य निर्णय झाला नाही तर
पुनर्वसनाचे शिक्के काढले जात नाही व सातबारा कोरा केला जात नाही . तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी केला आहे. शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार देखील येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
सद्यस्थितीमध्ये उपोषणकर्त्यांची आरोग्य विषयकस्थिती गंभीर बनत चाललेले आहे. तरीही उपोषण करते उपोषणावर ठाम आहेत त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झालेले आहे.
बेमुदत उपोषण आंदोलन स्थळी उपोषण करते यांना पाठिंबा देण्यासाठीगावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते, महिला, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, विविध सामाजिक कार्यकर्ते, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.