कोऱ्हाळे येथील शिंदे कुटुंबियांनी साकारला शिवकालीन देखावा

Uncategorized

प्रतिनिधी.

कोऱ्हाळे बुद्रुक येथील शिंदे कुटुंबीय नेहमीच गौरीपूजनाला सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करत असतात. यावेळी त्यांनी साकारलेला शिव चरित्रातील देखावा पाहण्यास परिसरातील महिलांची गर्दी होत आहे.
माळशिकारे वाडी येथील सुषमा शिंदे, मयुरी शिंदे,वैशाली शिंदे, मनीषा शिंदे, आकांक्षा कदम, ललिता शिपळकर यांनी हा देखावा साकारला आहे. देखाव्यात किल्ले रायगड, जिजाऊ, भवानी माते कडून तलवार घेणारे शिवाजी महाराज दाखवण्यात आले आहेत.