कौटुंबिक वादातून महिलेचा खून; सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार

प्रतिनिधी कौटुंबिक वादातून महिलेचा खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागातील शिंदे वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा खून केल्यानंतर सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार झाल्याचे उघडकीस आले आहे. आरती देबीलाल सरेन (वय ३२, सध्या रा. शिंदे वस्ती, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती देबीलाल लक्ष्मणचंद्र सरेन […]

Continue Reading

शर्ट नीट न खोचल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण; स्वारगेट पोलिसांकडून शिक्षकाविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी शर्ट नीट न खोचल्याने एका शाळेतील शिक्षकाने सहावीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. रक्तबंबाळ झालेला विद्यार्थी घरी पोहोचल्यानंतर पालकांच्या लक्षात हा प्रकार आला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.संदेश भोसले (वय २६) असे गुन्हा दाखल केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वारगेट परिसरातील महर्षीनगर […]

Continue Reading

मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचे बोपदेव घाटातून अपहरण, विनयभंग केल्याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीचे मोटारीतून अपहरण करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोटारचालक राजेखाँ करीम पठाण (वय ३६, रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली. तक्रारदार तरुणी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेली होती. त्यावेळी पठाण मोटारीतून तेथे आला. त्याने […]

Continue Reading

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून, मार्केटयार्ड परिसरात चौघांकडून कोयत्याने वार; उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू

प्रतिनिधी पूर्ववैमनस्य आणि तत्कालीन कारणातून झालेल्या वादात चौघांनी एका तरुणावर मार्केटयार्ड परिसरात बुधवारी रात्री नऊ वाजता कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिनेश उर्फ बाळासाहेब सुरेश रणदिवे (वय २८, रा. साईनगर गल्ली, अप्पर डेपो, बिबवेवाडी कोंढवा रस्ता) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, मार्केट यार्ड पोलिसांनी राहुल […]

Continue Reading

नराधम बापाकडून मुलीवर बलात्कार, शाळेच्या ‘गुड टच बॅड टच’ उपक्रमात मुलीकडून वाच्यता

अश्लील चित्रीकरणे दाखवून पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या शाळेत आयोजित ‘गुड टच बॅड टच’ उपक्रमात मुलीने या विषयी वाच्यता केल्यानंतर याप्रकरणी वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल करून ३५ वर्षीय नराधम बापाला अटक केली. भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (फ) (आय) (एम), ६५, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण […]

Continue Reading

पुणे रेल्वे स्थानकातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण, गुजरातमधून महिलेसह दोघांना अटक; बालक सुखरुप

प्रतिनिधी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण करण्यात आले. लोहमार्ग पोलिसांनी तपास करून अहमदाबादमधून एका महिलेसह दोघांना अटक केली. अपहृत बालकाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मोहम्मद खान कुरेशी (वय २७), नजमा अक्रम खान कुरेशी (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत बालकाची आई पूजा संतोष दास (वय २८, रा. झारखंड) यांनी […]

Continue Reading

सायबर चोरट्यांकडून दोघांची ५७ लाखांची फसवणूक

प्रतिनिधी सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र कायम आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोघांची ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजीनगर आणि वारजे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत एका तरुणाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कर्वेनगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर काही दिवसांपूर्वी संपर्क साधला होता. […]

Continue Reading

पाच कोटींच्या खंडणीसाठी पुजाऱ्यासह शिष्यांचे अपहरण, कर्नाटकातून तिघे अटकेत

प्रतिनिधी धार्मिक कार्यक्रमासाठी कर्नाटकात नेण्याच्या बहाण्याने पुजाऱ्यासह शिष्यांचे पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बिबवेवाडी आणि कर्नाटक पोलिसांच्या पथकाने कर्नाटकातून तिघांना अटक केली. आरोपींना न्यायालयाने पाच ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रामू अप्पाराय वळुन (वय २९, रा. त्रिकुंडी, ता. जत, सांगली), दत्ता शिवाजी करे (वय २०), हर्षद सुरेश पाटील […]

Continue Reading

बारामती मधील नामांकित कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याचा खून?

संपादक मधुकर बनसोडे. विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यातील एका महाविद्यालयातील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्याच्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने कोयत्याने वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी बारामतीत घडला.या प्रकारामुळे बारामती शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घडलेल्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .दोघांमध्ये पार्किंगला गाडी लावण्यावरून काही दिवसांआधी भांडण झाल्याची चर्चा […]

Continue Reading

संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर ११ जणांकडून लैंगिक अत्याचार

प्रतिनिधी जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून पुण्यातील हडपसर परिसरात १४ सप्टेंबर रोजी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चार आरोपींना पोलीसांनी अटक केली होती. त्या आरोपींकडे अधिकचा तपास केल्यावर आणखी सात जणांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून आणखी सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा […]

Continue Reading