• Home
  • माझा जिल्हा
  • नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. दोन वर्षानंतर खळखळणार नीरेचे पाणी.
Image

नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. दोन वर्षानंतर खळखळणार नीरेचे पाणी.

नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. दोन वर्षानंतर खळखळणार नीरेचे पाणी.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसात पावसाचा जोर भरपूर असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दिनांक २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता वीर धरणाची पाणी पातळी ५७७.६९ मी. व उपयुक्त पाणीसाठा ७.१३२ टीएमसी इतका असून वीर धरण ७५.८०% भरले आहे.

वीर धरणामध्ये पाण्याची आवक व पावसाचा जोर पाहता वीर धरणामधून  दिनांक २५ जुलै रोजी दुपारी ४ वाजता १००० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. तसेच धरणामध्ये येणा-या पाण्याच्या येव्यानुसार आवश्यकतेप्रमाणे टप्प्याटप्प्याने नदीमध्ये विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सबब वीर धरणाच्या खालील बाजूस निरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तरी नीरा नदी काठच्या लोकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतचे आवाहन कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी केले आहे.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026