नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. दोन वर्षानंतर खळखळणार नीरेचे पाणी.
प्रतिनिधी – फिरोज भालदार
नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसात पावसाचा जोर भरपूर असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दिनांक २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता वीर धरणाची पाणी पातळी ५७७.६९ मी. व उपयुक्त पाणीसाठा ७.१३२ टीएमसी इतका असून वीर धरण ७५.८०% भरले आहे.
वीर धरणामध्ये पाण्याची आवक व पावसाचा जोर पाहता वीर धरणामधून दिनांक २५ जुलै रोजी दुपारी ४ वाजता १००० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. तसेच धरणामध्ये येणा-या पाण्याच्या येव्यानुसार आवश्यकतेप्रमाणे टप्प्याटप्प्याने नदीमध्ये विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सबब वीर धरणाच्या खालील बाजूस निरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तरी नीरा नदी काठच्या लोकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतचे आवाहन कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी केले आहे.