• Home
  • क्राईम
  • प्राचार्याने मुलीची छेड काढली; तरूणांनी धो..धो…धुतले, नोकरीही गेली…
Image

प्राचार्याने मुलीची छेड काढली; तरूणांनी धो..धो…धुतले, नोकरीही गेली…

प्रतिनिधी

भंडारा  बागेत खेळत असलेल्या एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिची छेड काढणाऱ्या एका प्राचार्याला तेथे उपस्थित तरुणांनी चांगलाच चोप दिला. एवढेच नाही तर त्यानंतर झालेल्या पोलीस कारवाईमुळे या प्राचार्याला त्याची नोकरी ही गमवावी लागली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.

प्राप्त माहितीनुसार, साकोली येथील एका फार्मसी कॉलेजमध्ये प्राचार्य पदावर कार्यरत असलेला डॉ. पी. एस .रघु हा दक्षिण भारतीय असून येथील पंचशील वार्डात भाड्याने राहतो. राष्ट्रीय महामार्गाला लागून स्टे ईन हाँटेलच्या समोर असलेल्या बागेत खेळण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला जवळ बोलवून तिच्याशी अश्लील चाळे करीत, नको त्या ठिकाणी स्पर्श करणे सुरू केले. त्यामुळे मुलगी घाबरली व रडत घरी जाऊन तिने आईला झालेला प्रकार सांगितला. तोपर्यंत बागेत फिरायला आलेल्या तरुणांनाही हा प्रकार माहित झाला.

चिडलेल्या तरुणांनी या प्राचार्याला घराबाहेर काढून त्याचे कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली आणि पोलिसांना बोलावून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी रघु याला ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध कलमान्वये पोक्सो अंतर्गत कारवाई केलेली आहे. प्राचार्याच्या गैरवर्तनाला पाहून कॉलेज व्यवस्थापनाने रात्रीच या प्राचार्याचा राजीनामा घेऊन त्याला नोकरीतून बडतर्फ केले आहे. उच्चशिक्षित आरोपी प्राचार्य पदावर काम करत होता. तो दक्षिण भारतीय असून तो लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी बोलताना इंग्रजीचा वापर करत असे. या प्रकरणाचा तपास साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमित्रा साखरकर या करीत आहेत.

Releated Posts

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026

​मेढद येथे माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

सहसंपादक- अक्षय थोरात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार, माळेगाव…

ByBymnewsmarathi Jul 1, 2026